जायफळ उगाळून डोक्याला लेप लावावा. लिंबू सरबत प्यावे. सुंठ बारीक वाटून शुध्द शेळीच्या दुधात मिसळून नाकातून थेंब ओढून घ्यावे. डोकेदुखीत आराम मिळतो.
तीव्र डोकेदुखीसाठी कपाळावर वेखंड उगाळून लेप लावावा.
कच्चा कांदा वाटून, त्यात गोमूत्र मिसळून छोटे गोळे बनवावे. कापडाने गाठीवर बांधावे, याने वेदना कमी होतात. कांचनार सालीचा काढा घ्यावा.
वजन प्रमाणात ठेवावे. मांसाहार, मद्यपान बंद करावा. अतितेलकट, तूपकट पदार्थ व फास्ट फूड बंद करावे.
वेळेवर कान साफ करावे. हेडफोन वर मोठ्या आवाजात संगीत ऐकू नये. नाकात तेलाचे थेंब (नस्य) घालावे.
कान दुखल्यास, कांदा बारीक करून त्याचा रस कापडाने गाळून घ्यावा. तो रस गरम (सोसवेल इतका) करून कानात 4- 5 थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होईल.
जंत होऊ नये या साठी बाहेरचे खाणे टाळावे. मोकळ्या पायाने रस्त्यावर फिरणे टाळावे. जेवणात दालचिनी असावी. एरंडेल / तत्सम उपायांनी पोट साफ ठेवावे. उत्तम शारीरिक स्वछता असावी.
जेवणापूर्वी, जेवण बनवण्यापूर्वी हात धुवावेत. प्रातःकर्मानंतर हाथ स्वच्छ धुवावे. 1 चमचा सोयाबीनच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून सकाळी -दुपार -संध्याकाळी प्यावे, जंत, कृमी काही दिवसात मरुन बाहेर पडतात.
काळया मनुका रात्रभर पाण्यात भिजत ठेऊन, सकाळी खाव्या व ते पाणी प्यावे. पालघर विभागात ‘तर्ले’ मिळते. ते खावे.
1 मोठ्या आकाराचे लिंबू कापून घ्यावे. जिथे दव पडेल, अशा जागी त्याला रात्रभर ठेवावे. त्यानंतर सकाळी ते लिंबू एका ग्लास साखरेच्या पाण्यात पिळून, त्यात किंचित काळं मीठ टाकून सेवन करावे.
दात स्वच्छ घासल्यानंतर हिरड्यांवरून बोट फिरवावे. त्यांचा मसाज होऊन रक्ताभिसरण व्यवस्थित होते. एकंदरच अति साखर कमी करावी. रोज रात्री दात घासावे. ऐकीव औषधं दातांसाठी वापरु नका. दूध दह्याच्या सेवनातून दातांसाठी कॅल्शिअम, फॉस्फरस मिळतो.
अधूनमधून कोमट पाण्यात सैंधव मीठ टाकुन गुळण्या कराव्यात. हळद आणि बारीक केलेले खडे मीठ, शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते.
कापराची बारीक पूड करून बोटाने दातांवर लावून चोळावी. छिद्रं पूर्णपणे साफ, स्वच्छ करा. त्यानंतर कापूर छिद्राखाली काही वेळ दाबून ठेवल्याने दातदुखी हळूहळू कमी होते.
कोरफडीच्या रसात सैंधव मीठ (एक चमचा रस + चिमूटभर मीठ) घालून सकाळी व रात्री दिल्सास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो.
तुरटी तव्यावर भाजून (लाही) बारीक वाटून घ्या. त्यानंतर तुरटीचे 3 भाग घेऊन तेवढीच साखर त्यात मिसळून सकाळ, दुपार, संध्याकाळ घेतलं, तर डांग्या खोकला बरा होतो.
लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर कांद्याचा 10 gram रस सकाळ संध्याकाळी गरम करून दिला तर जंत नक्कीच मरतात. लहान मुलांना साध्या पाण्याऐवजी वावडिंगाचं पाणीच पाजावे.