आला पावसाळा, आरोग्य सांभाळा पावसाळ्यात या 8 गोष्टींची काळजी घ्या

उन्हाळ्यातील मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेला पावसाळा  आपणा सर्वांनाच आवडतो. शितल वाऱ्यासोबत पडणारा पाऊस आपलं मन आणि सर्व वातावरण प्रसन्न करून टाकतो. आपल्याला या थंड, मस्त, गारेगार पावसाचा तर आनंद घ्यायचा आहेच. पण त्यासोबतच निरोगी राहण्यासाठी काही दक्षता सुद्धा घ्यायची आहे.

अति पावसामध्ये भिजलात तर लवकरात लवकर अंग व केस कोरडे करून घ्यावेत. हातपाय स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करावे. एसी असलेल्या रूम मध्ये ओल्या कपड्याने जाऊ नये.

1

पावसात बाहेर पडल्यावर जिथे पाणी जमले असेल अश्या जागी चालणे टाळावं. कारण त्यामध्ये भरपूर किटाणू आणि बॅक्टेरिया असतात, त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. महत्त्वपूर्ण कामाव्यतिरिक्त जाऊ नये.

2

पावसाळ्यात शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं. विशेषतः रस्त्यावरील फास्टफूड व इतर अन्न हायजेनिक नसतात. त्यामुळे आपल्याला जुलाब, डायजेशन, डोळ्यां, घशाचे असे अनेक आजार होऊ शकतात.

3

पावसाळ्यात आंबट, तिखट, तेलकट, आंबवलेले, चटपटीत पदार्थ खाण्याची भरपूर इच्छा होते. असे पदार्थ  एक तर घरात बनवून खावे आणि प्रमाणात खाव। आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद झालेली असते.

4

घरामध्ये, घराच्या आजूबाजूला आणि ऑफिसजवळ कुठेही पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. विशेषतः कूलर, फ्लॉवरपॉट, घरातील पाण्याच्या छोट्या टाक्या साफ ठेवा. कारण अशा जागी डासांचा बनतात आणि अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.

घरात फळे आणून, स्वच्छ धुवून खा. रस्त्यावर फ्रूट प्लेट वगैरे खाऊ नका.

6

लक्षात घ्या की, पावसाचा काळ हा निसर्गातील सृजनाचा म्हणजेच निर्मितीचा काळ असतो. त्यामुळे बॅक्टेरियांची वाढ खूप फास्ट होत असते. म्हणून संपूर्ण स्वच्छता खूप महत्त्वपूर्ण आहे.

7

घराबाहेर अनेक तास राहत असाल तर सोबत प्रथमोपचार औषधे न्यायला विसरू नका. (ताप, सर्दीखोकला, मलमपट्टी, अतिसार, वेदनाशामक)

8

जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख । साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग । शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात । ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।। झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची । सर येते माझ्यात ॥

Read More