दीर्घकालीन तणावामुळे एकूण संज्ञानात्मक क्षमतेवर (cognitive ability) परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे स्मरणशक्ती तर्क शक्ती आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
तणावामुळे विविध कार्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता साधणे कठीण होते. ज्यामुळे उत्पादकता कमी होते आणि माहिती संकलनाची क्षमता कमी होते.
दीर्घकालीन तणावामुळे विस्मरण वाढते. ज्यामुळे महत्त्वाचे तपशील जागा घटना व्यक्ती इत्यादी गोष्टी लक्षात ठेवणे कठीण होते.
वर्किंग मेमरी, जी तात्पुरती माहिती लक्षात ठेवण्यासाठी आणि हाताळण्यासाठी जबाबदार आहे ती दीर्घकालीन तणावामुळे विस्कळीत होते. ज्यामुळे नवीन माहिती लक्षात ठेवण्याची प्रक्रिया कठीण होत जाते.
हिप्पोकॅम्पस हा भाग मेंदूमध्ये विविध प्रकारची माहिती साठवण्याचे आणि पुन्हा आठवण्यासाठी मदत करण्याचे काम करतो. तणावामुळे याच्या संरचनेत बदल होऊन दीर्घकालीन स्मरणशक्ती वर परिणाम होतो आणि आणि त्याचा इलाज करणे कठीण होऊ शकते.