शरीराची रक्तशर्करा नियंत्रण करण्याची यंत्रणा बिघडली की रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे लघवी वाटे साखरेचा निचरा होऊ लागतो.शरीरात स्वादुपिंडाच्या पेशींमधून इन्सुलिन नावाचे हार्मोन रक्तात वाहत असते. इन्सुलिन चा पुरवठा काही कारणामुळे कमी झाला किंवा नाहीसा झाला तर रक्तातील साखर नेहमीपेक्षा जास्त वाढते, याला मधुमेह असे म्हणतात.
1. आवळे आणि जांभळाच्या बिया
रोज सकाळी उपाशीपोटी वाळलेले आवळे आणि जांभळाच्या बियांचा गर समप्रमाणात घेऊन 8 ग्रॅम चूर्ण बनवून पाण्याबरोबर घ्यावे मधुमेह कंट्रोल मध्ये येईल.
2. फणसाची पाने
दर दिवशी फणसाच्या पानांचा रस सेवन करावा
3. लिंबाची पाने
लिंबाच्या कोवळ्या पानांचा रस घेतल्यामुळे मधुमेह नियंत्रणात येतो
4. कडुलिंबाची पाने
रोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानाचा रस प्यायल्याने मधुमेह आटोक्यात येतो
5. पथ्य
योगासने करणे, सकाळी चालायला जाणे, गवतावर उघड्या पायांनी चालणे, तसेच, डायबिटीससाठी नियोजित पथ्य पाळणे, वेळेवर जेवणे, इत्यादी गोष्टी जरी केल्या तरी डायबिटीस नियंत्रणात राहतो.
6. फरसबी आणि कोबी
फरसबी आणि कोबी (पत्ताकोबी) यांच्या रसाचे मिश्रण सुद्धा मधुमेह नियंत्रणात ठेवते.
7. बेल आणि सीताफळाचे पान
बेल आणि सीताफळाचे पान यांचे चूर्ण तयार करून प्रत्येक दिवशी सेवन केल्यास डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते.