काकडीच्या रसाचे आरोग्यदायी फायदे

Yellow Leaves
Open Hands

काकडी ही सामान्यतः कोवळी असतानाच खाल्ली जाते. काकडीमध्ये जवळजवळ 96% पाणी असते. तसेच त्यात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन बी, लोह, इत्यादी मुबलक प्रमाणात आढळते. काकडी त्वचेला तजेलदार ठेवण्यास मदत करते. आता आपण काकडीचे अन्य कोणते आरोग्योपयोगी गुण आहेत ते पाहूया, तसेच काकडीचा रुचकर रस बनवण्याची पाककृतीही जाणून घेऊया.

1. काकडी थंड, अग्निशामक पाचक, मूत्रगामी, रुचकर शीतकारक आणि मधुर असते. सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरती काकडीचा रस अत्यंत गुणकारी आहे.

2. काकडीमध्ये पित्तहारक गुण असल्यामुळे ती शरीराचा दाह नाहीसा करून शरीरात थंडावा आणण्यास मदत करते.

3. संधिवात व तत्सम विकारांवरती काकडीचा रस अतिशय उपयोगी असतो.

4. काकडी मध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्यामुळे स्थूलपणा कमी करण्यासाठी काकडीचा रस सेवन करणे अतिशय फायद्याचे आहे.

वेळ: 5 Mins

काकडीचा रुचकर रस बनवण्याची सोपी कृती:

काकडी: २ मोड आलेली मटकी: अर्धी वाटी लिंबू: अर्धी फोड तुळशीची पाने: २ ते ३ पाने

साहित्य:

White Scribbled Underline

लिंबाची अर्धी फोड बाजूला ठेवून सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्याचबरोबर गरजेनुसार थोडे पाणी सुद्धा घालावे. या मिश्रणाला गाळून ग्लासात ओतावे आणि वरून लिंबू पिळून सर्व्ह करावे. तुळशीचे ताजे पान आणि आल्याचे छोटेसे काप वरती ठेवून सर्व्ह केले तर अति उत्तम!

कृती: