काकडी ही सामान्यतः कोवळी असतानाच खाल्ली जाते. काकडीमध्ये जवळजवळ 96% पाणी असते. तसेच त्यात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन बी, लोह, इत्यादी मुबलक प्रमाणात आढळते. काकडी त्वचेला तजेलदार ठेवण्यास मदत करते. आता आपण काकडीचे अन्य कोणते आरोग्योपयोगी गुण आहेत ते पाहूया, तसेच काकडीचा रुचकर रस बनवण्याची पाककृतीही जाणून घेऊया.
वेळ: 5 Mins
काकडी: २ मोड आलेली मटकी: अर्धी वाटी लिंबू: अर्धी फोड तुळशीची पाने: २ ते ३ पाने
लिंबाची अर्धी फोड बाजूला ठेवून सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्याचबरोबर गरजेनुसार थोडे पाणी सुद्धा घालावे. या मिश्रणाला गाळून ग्लासात ओतावे आणि वरून लिंबू पिळून सर्व्ह करावे. तुळशीचे ताजे पान आणि आल्याचे छोटेसे काप वरती ठेवून सर्व्ह केले तर अति उत्तम!
कृती: