आपण बऱ्याचदा जेवणानंतर वेलची मुखवास म्हणून खातो. त्यामागे पचन सुलभ करण्याचे कारण आहे. तसेच वेलची गॅस आणि जेवण अजीर्ण होण्यास रोखते. मसाल्यांमध्ये वेलची ला सर्वश्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. अशा अनेक गुणधर्मांमुळे वेलची ला आरोग्यदायी म्हणतात.
1. सर्व प्रकारचे दंतविकार तोंडातले व्रण आग होणे यांसारख्या समस्यांसाठी वेलचीचे सेवन फायदेशीर असते.
2. वेलची कफ, विषदोष, बस्ती रोग, मूत्ररोग, किडनी स्टोन यांचा सर्वनाश करते.
3. वेलची पोटात गॅस्ट्रिक रसाच्या उत्पादनास मदत करते. शरीरातील ऍसिड संतुलित ठेवते, त्यामुळे पोटांच्या रुग्णांकरिता ही अत्यंत गुणकारी आहे.
4. अंगातील उष्णता मूत्रावाटे बाहेर काढण्यास वेलची मदत करते. तसेच युरिनरी ट्रॅक मधील संक्रमण दूर ठेवते.
5. वेलचीचे दाणे तव्यावर भाजून त्यांचे चूर्ण बनवून मधातून सेवन केल्यास कफ खोकला अन्य घशाचे इन्फेक्शन बरे होतात.
6. वेलची चा काढा बनवून, त्यात गूळ मिसळून सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास सतत येणारी चक्कर थांबते.