लिंबू पाण्याचे आश्चर्यकारक फायदे

लिंबाचे फायदे सांगावे तितके कमीच! लिंबू पाणी हे प्रामुख्याने प्रथिने कार्बोहायड्रेट्स खनिजे आणि व्हिटॅमिन सी यांनी समृद्ध असलेले पेय आहे. तसेच लिंबू पाणी फक्त आरोग्य उपयोगी नव्हे तर सौंदर्यवर्धक सुद्धा आहे.

1. लिंबू हा फक्त व्हिटॅमिन सी युक्तच नाही तर त्यात, थायमिन व्हिटॅमिन बी-6, नियासीन, रायबोफ्लेविन, विटामिन ई सुद्धा असते.

2. पचनक्रिया व वजन संतुलित करण्यास लिंबू अत्यंत लाभदायक आहे.

3. लिंबू पाणी शरीराला रिहायड्रेट करण्यास मदत करते. तसेच लिंबामुळे लघवी पातळ होऊन मुतखडा होण्याचा धोका कमी होतो.

4. रोज सकाळी गरम पाण्यात लिंबू घालून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.

5. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लिंबू पाण्यामधील बायोफ्लाव्होनॉईड्स, विटामिन सी आणि फायटोन्यूट्रियंट्स मदत करतात.

6. संधिवात आणि ऍसिडिटी साठी लिंबू पाणी अत्यंत गुणकारी आहे.