5

प्रत्येक आईला हे

आयुर्वेदिक घरगुती उपाय माहिती हवे

आईला आपल्या मुलांची काळजी सतत असतेच. लहान सहान आजार सुद्धा डोक्याला ताप करू शकतात. त्यासाठीच परंपरागत चालत आलेल्या पैकी 5 घरगुती उपाय या भागात समजावून सांगितले आहेत. सर्व आई व मुलांना याचा नक्कीच फायदा होईल.

1. मध

1. मध

सध्याच्या काळात अति पाऊस व थंडी तसेच थंड पदार्थ खाल्ल्यामुळे घसा खवखवायला सुरुवात होतो. जो अतिशय सामान्य त्रास आहे. यावरती सहज उपलब्ध होईल असे '' अत्यंत गुणकारी आहे. ज्यामुळे खवखव कुठलेही औषध न घेता थांबून जाते.

2. साखर

2. साखर

मुलांना अचानक उचकी लागल्यास साखर खायला देऊ शकता. मेंदू आणि पोट यांना जोडणाऱ्या वॅगस नर्व्ह वर साखरेचा परिणाम होऊन, घशाच्या मागच्या भागात ती मंद इरिटेशन निर्माण करते. ज्यामुळे उचक्या थांबण्यास मदत होते.

3. ओट्स

3. ओट्स

खाण्यात वापरले जाणारे हे ओट्स मुलांच्या अंगावरील खाजेवर उपयोगी ठरतात. आंघोळीच्या पाण्यात ओट्सची पावडर टाकून आंघोळ केल्याने त्वचेवरील खाजेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

4. लिंबू

4. लिंबू

अपचनाचा त्रास मुलांना असल्यास, विटामिन सी युक्त लिंबूचा रस जेवणानंतर द्यावा. अपचनाचा त्रास नक्कीच कमी होईल.

5. हळदीचे दूध

5. हळदीचे दूध

पावसाळ्यात व हिवाळ्यात थंडीपासून बचावाकरिता हळदीचे दूध अत्यंत गुणकारी आहे. बाळांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच त्यांची त्वचा तजेलदार होते. ज्यामुळे खाज स्किन इन्फेक्शन यांसारख्या त्वचेच्या विकारांपासून लहान बाळांचा बचाव होतो.

5. हळदीचे दूध

जेवणानंतर हळदीचे दूध दिल्यास झोप न येण्याची समस्या दूर होते. तसेच अपचन, डायरिया, अल्सर यांसारख्या पचनासंबंधीत समस्या दूर होतात. हळदीच्या दुधातील कॅल्शियम, मिनरल आणि पोषक तत्व, अतिरिक्त चरबी व वजन कमी करण्यास मदत करतात.