"पुरुषोत्तम मास" म्हणजेच अधिक महिन्याबद्दलच्या या महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

10

1. अधिक महिना दर तीन वर्षांनी येत असतो.

चैत्र ते आश्विन पैकी कोणताही महिना हा अधिक महिना असू शकतो.

2. जगतपालक श्रीविष्णुला प्रिय असणारा हा अधिक महिना आहे.

या अधिक महिन्यात सतत श्रीविष्णु चे स्मरण करावे.

3. या वर्षी अधिक श्रावण असल्यामुळे चातुर्मा व्रतासाठी 8 श्रावणी सोमवार प्राप्त होतात.

4. या महिन्यात एकभुक्त (एक वेळ भोजन) राहावे आणि पूजन, कुलदेवता नामस्मरण, अनुष्ठान, साधना यांना विशेष महत्त्व आहे.

5. दीप दानाला अधिक महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दीपदान जरुर करा. तसेच विष्णुसहस्रनामाचे नेहमी वाचन करा.

तसेच जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस,, मेथी या पदार्थांचे सेवन करावे.

6. या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ

7. लग्नकार्य व तत्सम इतर मंगल कार्य सोडून कोणतीही महत्त्वपूर्ण कामे या अधिक महिन्यात करता येतात.

8. लक्ष्मी प्राप्तीसाठी अधिक महिनाभर अखंड दिवा लावावा. दिव्याची पूजा करावी.

9. या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्ट मित्र-नातेवाईकांना भोजन देतात. या दिंड्यांना 'धोंडे' सुद्धा म्हणतात. म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात.

गो मातेलाही रोज पुरणपोळी खाऊ घालावी.

10. अधिक महिन्यात अपशब्द बोलणे, संयम सोडून वागणे, रागावणे, खोटे बोलणे इत्यादी कृत्ये करुच नयेत.

"अधिक मास व्रताची' सुसंधी प्राप्त करा व आजपासूनच व्रताला सुरुवात करा.